अजितदादांच्या निकटवर्तीयावर सोलापूर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यपदाची धुरा; पक्षप्रवेशानंतर अवघ्या 5 महिन्यांत मिळाले मोठे पद!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सात महिन्यांनंतर नवा कॅप्टन मिळाला आहे. मात्र, उमेश पाटील यांच्या नियुक्तीने सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपक साळुंखे यांनी (NCP) जिल्हाध्यक्षपदाचा, तसे पक्षाचा राजीनामा […]