आमच्याबद्दल
नरखेड, मोहोळ (सोलापूर जिल्हा) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक सजग, प्रभावी आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात. कृषी विषयात पदव्युत्तर (एम.एस्सी. ॲग्रो.) शिक्षण घेतलेल्या पाटील यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात कृषी विद्यार्थी आंदोलनातून केली आणि पक्षाच्या स्थापनेपासूनच ते सक्रिय राहिले आहेत.
शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी महाराष्ट्रभर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष,प्रदेश प्रवक्ते म्हणून आपल्या भूमिकेचे नेटाने आणि प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत आहेत.
बांधिलकी फक्त जनसेवेशी....
शिक्षण
कृषी पदव्युत्तर (M.Sc. Agriculture)
मूळगाव
मोहोळ, जिल्हा सोलापूर
पार्श्वभूमी
शेतकरी कुटुंबातील




राजकीय टप्पे आणि नेत्याच्या भूमिका
उमेश सुरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले एक धडाडीचे अभ्यासू, स्पष्टवक्ते व कार्यक्षम नेतृत्व आहे. अत्यल्प वयात पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत सामील होण्याचा इतिहास त्यांच्या नावे आहे. राज्यभर विविध राजकीय जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी संघटनात्मक, सामाजिक आणि निवडणूक रणनीतीमध्ये भरीव कामगिरी केली आहे.
आतापर्यंत भूषवलेली व सध्या भूषवत असलेली पदे
राष्ट्रीय सरचिटणीस
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (2009 – 2010)
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (2010 – 2012)
(मा. शरद पवार साहेबांनंतर सर्वात कमी वयात प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य होण्याचा मान)
प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (2012 – 2015)
प्रदेश प्रवक्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (2012 – आजपर्यंत)
लोकसभा निरीक्षक
कल्याण लोकसभा (2014)
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (2015 – आजपर्यंत)
जिल्हा प्रभारी
नंदुरबार (2015 )
पार्लमेंटरी बोर्ड मेंबर
• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (2015)
जिल्हा परिषद सदस्य
नरखेड, सोलापूर (2017-2021)
जिल्हा नियोजन समिती सदस्य
सोलापूर (2017)
प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन. महाराष्ट्र राज्य.
कार्यकारी जिल्हाध्यक्ष
सोलापूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
लोकसभा निरीक्षक
मावळ लोकसभा मतदारसंघ (पुणे जिल्हा) निरीक्षक मा.पार्थदादा अजितदादा पवार(2019)
2022 – 2025 दरम्यानच्या नवीन जबाबदाऱ्या:
2022
वाशीम जिल्हा निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2023
नांदेड जिल्हा महायुती समन्वयक
2024
महाराष्ट्र प्रदेश स्टार प्रचारक
2025
जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शैक्षणिक पार्श्वभूमी
१ ली ते २ री
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर
३ थी ते ४ वी
जिल्हा परिषद शाळा मोहोळ
५ थी ते १० वी
नेताजी प्रशाला, मोहोळ
११ वी ते १२ वी
दयानंद कॉलेज, सोलापूर
B.Sc. (Agri) व M.Sc. (Agri
दापोली कृषी विद्यापीठ, रत्नागिरी
MPSC/UPSC अभ्यास
ज्ञानप्रबोधिनी, पुणे
नवचैतन्य /UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र क्लासेस
हडपसर, पुणे
उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
- नवसंजिवन विद्यालय – “नापासांची शाळा” ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम राबविली (2005)
- स्मार्ट करिअर महाराष्ट्र पोलीस भरती अकादमी, पुणे – राज्यातील पहिले निवासी प्रशिक्षण केंद्र स्थापन
- अंबिका मजूर सहकारी संस्था मर्या. चालू आहे
- जनता प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून समाजकार्य (२०२३ ते आतापर्यंत)
- शक्ती फाउंडेशन ( सध्या चालू)
- राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन (सध्या चालू आहे विविध उपक्रम घेतले जातात नोकरी महोत्सव सारखे, महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात संघटेनेचे मोठे काम चालू आहे)
- महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघ ( सध्या कार्य चालू आहे)
- सोलापूर अग्रो ही शेती संदर्भातील संस्था आहे या मध्ये “पाटील फार्म “ नरखेड येथे विविध शेती पिकांची उत्पादने घेतली जातात शेवगा शेती, आंबा शेती, ड्रैगन फ्रूट शेती, सोयाबीन शेती, ऊस शेती, नारळ शेती, सर्व प्रकारच्या पाले भाज्या, फळ भाज्या, पशुखाद्य निर्मिती, कुक्कुट पालन, शेळीपालन, मत्स्यपालन, खेकडा पालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, सेंद्रिय खते निर्मिती प्रकल्प, भव्य अशी ३ शेत तळे, भव्य अशी विहीर, इत्यादी..
- जनता गोवर्धन गोवंश गोशाळा नरखेड. (सरकार मान्य अनुदानित गोशाळा) सध्या चालू
- सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार पल्स युवकांना नोकरी या हेतूने भव्य असा रोजगार मेळाव्याचे पुढील ३ महिन्यात नियोजन..
- सावली बंगला मोहोळ येथे असताना नागरिकांसाठी रोज जनता संवाद / दरबार आयोजन
कौटुंबिक माहिती
- वडील: कै. सुरेश लिंबाजीराव पाटील
- आई: श्रीमती लोपामुद्रा सुरेश पाटील
- पत्नी: सौ. तृप्ती शशिकला उमेश पाटील-कोलते – तहसीलदार, महाराष्ट्र राज्य प्रशासन सेवा
- मुलगी: कुमारी शक्ती तृप्ती उमेश पाटील
- मुलगा: चिरंजीव क्रांतिसिंह तृप्ती उमेश पाटील